सुलेमान मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींवर मकोका लावा – एकता संघटनेची आमदार इद्रिस नाईकवाडे यांच्याशी चर्चा..

0

24 प्राईम न्यूज 25 Aug 2025


जळगाव जामनेर तालुक्यातील बेटावद गावात ११ ऑगस्ट रोजी मुस्लिम तरुण सुलेमानवर झालेली जमावमारहाण ही मानवतेला काळीमा फासणारी, पूर्वनियोजित आणि कटकारस्थानातून घडवून आणलेली घटना असल्याचा आरोप एकता संघटनेने केला आहे. या अमानुष हत्याकांडामुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजात प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

आज जिल्हा एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार तथा राज्याचे अल्पसंख्यक विभागाध्यक्ष मा. इद्रिस नाईकवाडे यांची भेट घेऊन या प्रकरणी सविस्तर चर्चा केली.

शिष्टमंडळाने पोलिस तपासाबाबत गंभीर शंका उपस्थित करत पुढील ठोस मागण्या आमदारांकडे मांडल्या –या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मकोका कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तपासात झालेली ढिलाई तात्काळ थांबवून मुख्य सूत्रधारांना अटक करावी आरोपींना जाहीर व कठोर शिक्षा होईल याची खात्री करावी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व संरक्षण द्यावे.

या शिष्टमंडळात फारुख शेख, हाफिज अब्दुल रहीम, अनीस शाह, जावेद मुल्ला, अशफाक पटेल, सुलेमानचे वडील रहीम पठाण आणि शाहरुख या भेटीत आमदार इद्रिस नाईकवाडे यांनी आश्वासन दिले की, “मी हे प्रकरण विधानसभा तसेच सरकारी पातळीवर ठामपणे मांडेन. सुलेमानच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!