मॉब लिंचिंग प्रकरणांच्या अनुषंगाने अल्पसंख्याक आयोगाचे प्रतिनिधीमंडळ जळगाव येथे दाखल झाले. प्रशासनाची तारांबळः दौरा असून माहिती नाही.


24 प्राईम न्यूज 27 Aug 2025
मॉब लिंचिंग प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे प्रतिनिधीमंडळ जळगावात दाखल झाले. मात्र या महत्त्वाच्या दौऱ्याबाबत कोणतीही पूर्वतयारी प्रशासनाने केलेली नसल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
आयोगाचे संचालक वसीम शेख आणि डॉ. अहमद शरीफ देशमुख यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची भेट घेऊन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. पीडितांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आयोगाकडून देण्यात आल्या.
आयोगाच्या भेटीदरम्यान एकता संघटना आणि अन्य सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. संघटनेतर्फे फारुक शेख यांनी सर्व कागदपत्रे आयोगास सादर केली. यावेळी एकता संघटनेने पीडित समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींना तात्काळ शिक्षा, शासनाकडून पीडितांना योग्य नुकसानभरपाई आणि पारदर्शक तपासाची मागणी केली. पोलिस अधीक्षकांना संघटनेतर्फे निवेदनही देण्यात आले.
आयोग व संघटनेने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, अल्पसंख्याक समाजाची सुरक्षा आणि न्याय देणे ही सरकार व प्रशासनाची थेट जबाबदारी आहे.
आयोगासोबत उपस्थित मान्यवर
फारुक शेख, बाबा देशमुख, अझीझ सालार, अनिस शाह, मतीन पटेल, हाफिज रहीम पटेल, मजहर खान, शाहिद मेंबर, अन्वर शिकलगर, फारुक कादरी, रईस कुरेशी, साजिद खान, जावेद मुल्लाजी (जामनेर), अशफाक पटेल, मतीन देशमुख (सिल्लोड), अब्रार देशमुख आदी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 102500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट