अमळनेरमध्ये HPV लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – १,२५० मुलींचे लसीकरण..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- लायन्स क्लब ऑफ अमळनेर व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने HPV लसीकरण शिबिर नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल येथे उत्साहात पार पडले या शिबिराचे उद्घाटन श्री. प्रकाशभाऊ मुंदडा यांच्या हस्ते झाले. समाजाच्या आरोग्यासाठी आयोजकांनी दाखविलेल्या बांधिलकीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

१,२५० मुलींचे लसीकरण
या शिबिरात तब्बल १,२५० मुलींना HPV लस देण्यात आली. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरले.
डी.आर. कन्या शाळा, PBA इंग्लिश मेडियम स्कूल, साने गुरुजी हायस्कूल, योगेश्वर हायस्कूल, लोकमान्य टिळक हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, भगिनी मंडळ स्कूल आदी शाळांतील विद्यार्थीनींनी याचा लाभ घेतला अध्यक्ष लायन डॉ. संदीप जोशी, सचिव लायन महेंद्र पाटील, खजिनदार लायन नितीन विंचुरकर, प्रकल्प अध्यक्ष लायन डॉ. मिलिंद नवसरीकर, लायन योगेश मुंदाडे व लायन डॉ. मायुरी जोशी यांच्या नियोजनशक्ती व संघटित प्रयत्नांमुळे शिबिर अत्यंत यशस्वी झाले शिबिराला डॉ. युसुफ पटेल, निरज अग्रवाल, डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकाश शाह, डॉ. मंजीरी कुलकर्णी, राजू नांडा, विनोद अग्रवाल, प्रशांत सिंघवी, एस.दि. भरुचा, दिलीप गांधी, महावीर पहाडे, सुनील चौधरी, प्रदीप जैन, हरिओम सोनी, प्रितेश मणियार, जितेंद्र जैन, रोनक दोढीवाला आदींसह मोठ्या संख्येने लायन्स सदस्य उपस्थित होते.

कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशन (CPAA) तर्फे डॉ. नुपूर खरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच लायन किशोर बेहराणी व लायन दिनेश बोरा यांचे मार्गदर्शन मिळाले.
नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी या कॅम्पसाठी अर्थसहाय्य करून दातृत्व दाखवले.

हे शिबिर म्हणजे लायन्स क्लब ऑफ अमळनेर व नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या सामूहिक आरोग्यविषयक ध्येयपूर्तीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, अमळनेरच्या आरोग्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल, असे मान्यवरांनी नमूद केले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 103300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!