संविधानिक हक्कांची पायमल्ली : मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एकता संघटनेची जोरदार मागणी..

24 प्राईम न्यूज 4 Sep 2025

भारतीय संविधानाने दिलेल्या समानता, न्याय व संधीच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत एकता संघटना जळगाव यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाचे लक्ष वेधले आहे.
सेवानिवृत्त प्राचार्य अकिल खान ब्यावली यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला ५% शैक्षणिक आरक्षण मान्य केले असूनही, शासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. हे न्यायालयीन निर्णयाचा अवमान असून, संविधानिक हक्कांचे उल्लंघन आहे. मराठा समाजासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली, परंतु मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजाला समान वागणूक व न्याय देण्याचे विधान केले असले तरी, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. शासनाने यावर ठोस भूमिका घेऊन मुस्लिम समाजाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेने दिला.
या संदर्भात एकता संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
या वेळी मुफ्ती खालीद, फारूक शेख, अन्वर सिक्कलगर, हाफिझ अब्दुल रहीम पटेल, अनिस शाह, मजहर पठाण, मतीन पटेल, उमर कासीम नजमुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 107700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट