मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार, तालुक्याचे लक्ष निकालावर लागून आहे..

.
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे. यातून बाजार समितीच्या कारभारीचा फैसला होणार असून लढती अत्यंत चुरशीच्या झाल्याने निकालाची प्रचंड उत्सुकता लागून आहे.बाजार समितीच्या मतमोजणी नंतर मतमोजणीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतपत्रिका वर्गीकरण गठ्ठे लावणे आदी प्रक्रिया सुरू होईल. तसेच उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांना बिल्ले देणे, नोंद घेणे आदी प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला सेवा सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण मतदार संघाची मोजणी सुरू होईल. त्यांनतर महिला मतदार संघ इतर मागासवर्गीय मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ, त्यांनतर ग्रामपंचायत मतदार संघ आणि सर्वात शेवटी हमाल मापाडी मतदार संघ अशी मोजणी होईल. एकूण आठ टेबल वर मोजणी होणार असून त्यासाठी साधारणतः ३० कर्मचारी नियुक्त केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर आर पाटील यांनी दिली