सोयगाव परिसरात मुसळधार-जरंडीला गारपीट खडकी नदीला पूर…

0


जरंडी (साईदास पवार).सोयगाव सह परिसरात रविवारी सायंकाळी सहा ते सात वाजता तासभर मुसळधार पावसाने तडाखा दिला दरम्यान

वादळी वाऱ्याचा तडाख्यात सोयगाव परिसरात वृक्ष उन्मळून पडली आहे त्यामुळे सोयगाव परिसरात सायंकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली होती
सोयगाव परिसराला सलग पाचव्या दिवशी अवकाळी च्या मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी पुरता खचून गेला असून वादळाचा तडाख्यात उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान वादळी वाऱ्याने जरंडी, निंबायती बहुलखेड, रामपुरा तांडा माळेगाव पिंप्री या गावांना वादळ चा तडाखा बसून घरांवरील पत्रे उडाली आहे एक तासांच्या पावसाने जरंडी मंडळात दाणादाण उडवून दिली
——-जरंडीसह परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा अधिक होता दरम्यान जरंडी परिसरात वीस मिनिटे गारपीट झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली होती
—–खडकी नदीला पूर
जरंडी परिसरातील धिंगापूर निंबायती या भागात अवकाळीच्या पावसाचं जोर अधिक होता त्यामुळे जरंडीच्या खडकी नदीला पूर आल्या मुळे गावाचा संपर्क तुटला होता… जरंडी च्या खडकी नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती गारपिटीने जरंडी ला चांगला च तडाखा दिला आहे रात्री उशिरा पर्यंत वादळी वारा आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानी चा आकडा हाती आला नव्हता……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!