बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुखाची नियुक्ती बद्दल कार्यकर्त्या मधे नाराजी चा सुर…

अमळनेर (प्रतिनिधी) बाळासाहेबांची शिवसेनेच्या तालुका प्रमुखांची नियुक्ती आम्हाला मान्य नाही आम्ही याबाबत वरिष्ठांची भेट घेऊन आमची भूमिका मांडू अशी माहिती तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुखपदी प्रथमेश पवार यांची नियुक्ती सचिव संजय मोरे यांनी जाहीर केल्यानन्तर अमळनेर तालुक्यात नाराजी पसरली होती. माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील , सुदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील ,महेश देशमुख , साखरलाल महाजन , गुणवंत पाटील ,भरत पवार ,टिनू बोरसे आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी महेश देशमुख यांनी सांगितले की ही नियुक्ती सदस्य नसलेल्या व्यक्तीला देण्यात आली आहे ,आम्हाला विश्वासात घेतले नाही. जे पदाधिकारी शिवसैनिक काम करीत आहेत त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे ही नियुक्ती मान्य नसल्याने आम्ही जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांना घेऊन वरिष्ठांची भेट घेऊन सविस्तर माहिती मांडण्यात येईल. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही नवनियुक्त तालुका प्रमुखाला ओळखत देखील नसल्याचे म्हटले आहे. मात्र वरिष्ठांचे आदेश आम्हाला मान्य असतील असेही सांगण्यात आले.