डिसेंबरनंतर अजितदादा मुख्यमंत्री-संजय राऊत..

24 प्राईम न्यूज 1Dec 2023
येत्या ३१ डिसेंबरनंतर उप मुखयमंत्री अजित पवार

राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा पुनरुच्चार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्यात आल्याचा धागा पकडत संजय राऊत यांनी हा दावा केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्हालादेखील वाटते की अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत. हा निकाल येताच शिंदे सरकार जाईल.