डी.आर.कन्या शाळेत प्रा.ललित मोमाया यांचे मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन..

अमळनेर /प्रतिनिधि येथील खा.शि.मंडळ संचलित डी.आर. कन्या शाळेत विद्यार्थिनींसाठी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.ललित मोमाया यांचे उद्बोधनपर मार्गदर्शन संपन्न झाले.
शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल व मुख्याध्यापिका सौ.सूर्यवंशी मॅडम यांच्या प्रेरणेने प्रा.मोमाया सर यांनी सकाळ विभागातील विद्यार्थिनींना आरोग्य व आहार, स्मरण शक्ती कशी वाढवावी यासंबंधी सखोल मार्गदर्शन करून व्यायाम, योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यामुळे मुलींना खूप मोलाची माहिती आणि आनंद मिळाला. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एम.पाटील यांनी प्रा.ललित मोमाया यांचे स्वागत केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सोनवणे मॅडम यांनी सरांचा परिचय करून दिला व आभार देखील व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.