स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई.] येथे नाताळ सण.. (ख्रिसमस )उत्साहात साजरा…..

अमळनेर /प्रतिनिधि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई.] येथे नाताळ सण (ख्रिसमस) उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सांताक्लॉज ची वेशभूषा धारण करून जिंगल बेल या गाण्यावर वर अतिशय उत्कृष्ट असे नृत्य सादर केले .त्यानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर करून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका मदर मेरी, फादर जोसेफ ,मेंडपाल, परी असे विविध वेशभूषा धारण करून प्रभू येशूच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशी नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांना “हॅप्पी ख्रिसमस डे “च्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी नाताळ विषयी व प्रभू येशूचा महिमा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच नाताळ विषयीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले . ‘राष्ट्रगान ‘म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.