जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात पिंगळवाडे शाळेच्या कब पथकाला प्रथम क्रमांकाचा बहुमान…

0

अमळनेर/प्रतिनिधि

जि.प.जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत साहेब व प्राथ.शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त (स्काऊट) विकास पाटील यांचे प्रेरणेने तसेच जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बी.व्ही.पवार यांचे मार्गदर्शन व अथक प्रयत्नातून जि.प.शाळेतील ५ ते १० वयोगटातील कब-बुलबुल विद्यार्थ्यांसाठी जि.प.जळगावच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद प्राथ.शिक्षण विभाग जळगाव, जळगाव भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्था जळगाव व एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल वावडदा ता.जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळावा दि.२३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी वावडदा ता.जळगाव येथे संपन्न झाला.
जिल्हास्तर कब-बुलबुल मेळाव्यात विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, शिस्त, जीवन मूल्ये विकसन यासोबत त्यांच्या सुप्त कला गुणांना प्रकटीकरणाची संधी म्हणून खालीलप्रमाणे स्पर्धी…
१. मोगलीची गोष्ट (कब साठी) / ताराची गोष्ट (बुलबुल साठी) सादरीकरण (सामूहिक स्पर्धा) २. विविध (वैयक्तिक) स्पर्धा : लिंबू चमचा शर्यत, गोणपाट शर्यत, क्राफ्ट स्पर्धा – कागद काम, चित्रकला स्पर्धा, चेंडू बकेटमध्ये टाकणे. ३. लोक नृत्य (सामुहिक) स्पर्धा : कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, लावणी नृत्य, कानबाई नृत्य, भांगडा नृत्य इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील स्वामी विवेकानंद कब पथकाने पहिल्याच दिवशी डांगर बु. येथील कब पथकासोबत कब ग्रीटींगसह फ्लॅग होस्टींगची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्विकारुन जिल्ह्याचे नेतृत्त्व व अमळनेर तालुक्याचे प्रतिनीधीत्व सिध्द केले. कब विभागात पिंगळवाडे येथील पथकास ‘मोगलीची कथा सादरीकरण’ (सामुहिक) स्पर्धेत प्रथम क्रमांक व ‘चेंडू बकेटमध्ये टाकणे’ (वैयक्तिक) स्पर्धेत चि.गिरीश किशोर चव्हाण (इ.2 री) यास उत्तेजनार्थ तसेच ‘क्राफ्ट – कागद काम’ (वैयक्तिक) स्पर्धेत चि.हर्ष समाधान पाटील (इ.3 री) यास उत्तेजनार्थ असे एकूण 1 सांघिक व 2 वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर मेळाव्यात कबमास्टर दत्तात्रय सोनवणे, स्वयंसेवक विक्रम शेलार यांचेसह शाळेतील 8 कब सहभागी झाले होते.
या सर्व चिमुकल्यांना कबमास्टर दत्तात्रय सोनवणे, मुख्याध्यापिका वंदना ठेंग, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी कब विद्यार्थ्यांचे अमळनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शा.पो.आ.अधिक्षक भुपेंद्र बाविस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, पोलीस पाटील गजेंद्र पाटील, सेवानिवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र देशमुख, उपाध्यक्षा मिना भिल, सर्व सदस्य तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पिंगळवाडे येथील सहभागी कब (बालवीर)
ध्रुवेश गणेश पाटील (इ.4 थी)
सलमान शाबानशा फकीर (इ.4 थी)
मयूर अमोल तिरमले (इ.4 थी)
सम्राट भूषण कोळी (इ.3 री)
हर्ष समाधान पाटील (इ.3 री)
राजवीर संजय पाटील (इ.3 री)
गिरीश किशोर चव्हाण (इ.2 री)
विकास बलराम बारेला (इ.2 री)

कार्यक्रमास जळगाव जिल्हा स्काऊट संस्थेचे अध्यक्ष संजयदादा गरुड, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथ.शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बी.व्ही.पवार, मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष जे.के.पाटील, माजी उपशिक्षणाधिकारी यंशवंत ठोसरे, गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, जिल्हा सचिव सरला पाटील, जिल्हा सहसचिव डी.एस.सोनवणे, जिल्हा संघटक (स्काऊट) संजय बेलोरकर, जिल्हा संघटक (गाईड) हेमा वानखेडे, शाळेचे उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, प्राचार्या जयश्री पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर मेळाव्यात जिल्हाभरातून १५ तालुक्यातील ४५० कब-बुलबुल विद्यार्थी व १०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!