प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, लखनौमध्ये घेतला अखेरचा श्वास..

24 प्राईम न्यूज 16 Jan 2023. प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी या जगाचा निरोप घेतला.आपल्या आईवर अनेक रचना लिहिणारे प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनौच्या पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. 9 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वयाच्या ७१ व्या वर्षी राणा यांनी अखेरचा श्वास घेतला. मुनाव्वर यांना किडनी आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्या होत्या.
पीटीआयच्या वृत्तानुसार, मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया हिने सांगितले की, रविवारी रात्री उशिरा तिच्या वडिलांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुनव्वर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. राणाचा मुलगा तबरेज याने सांगितले की आजारपणा मुळे ते 14-15 दिवस रुग्णालयात होते त्यांना प्रथम लखनौ येथील मेदांता येथे आणि नंतर एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. जिथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला..