पारोळ्यात असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
पारोळा येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र प्रदेश तेली समाज तालुकाध्यक्ष भागवत चौधरी,अशोक चौधरी,बबलू चौधरी,राहुल चौधरी,चेतन पाटील,दिनेश भामरे,योगेश चौधरी यांनी एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला.यावेळी जळगाव लोकसभा खासदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले तर सर्वांना कॅबिनेट मंत्री ना.गिरीश महाजन यांनी ही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या वेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण,अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान,भाजपा शहराध्यक्ष, मनीष पाटील,पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्ष नवल चौधरी, नगरसेवक पी.जी.पाटील अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ.आसिफ कुरेशी,जिल्हा चिटणीस अलीम ईशा,जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते.
लोणी बु. (ता.पारोळा) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर बापूराव केदार यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पारोळा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.याबाबत एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील यांचा हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनीष पाटील, नगरसेवक पी जी पाटील,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक नवल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील आदी उपस्थित होते.