धार मालपूर परिसरातील गावांचा बैलगाडी मोर्चा, शेतकऱ्यांनी केली प्रांताधिकारी आवारात ठेचा भाकरीचा आस्वाद, अखेर पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित..


अमळनेर/प्रतिनिधि
धार मालपूर परिसरातील गावांचा बैलगाडी मोर्चा, शेतकऱ्यांनी केली प्रांताधिकारी आवारात ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला. याशिवाय ठोस पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत असा पवित्रा प्रा गणेश पवार यांच्यासह परिसरातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.
सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. दोन बैलगाड्यांनी प्रतिकात्मक प्रवेश केला तर उर्वरित १५० गाडीबैल बाजूच्या आवारात सोडण्यात आलेत. त्यानंतर दीड वाजेच्या सुमारास आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयातच ठेचा भाकरी खाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गिरणा पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ सिद्धार्थ पाटील, कनिष्ट अभियंता अतुल महाजन, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आदी अधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. गणेश पवार, शिवाजी पाटील, सचिन पाटील, विश्वास पाटील, सचिन वाघ, जितेंद्र पाटील, प्रफुल्ल पवार, गणेश पाटील, राहुल पाटील यांच्यासह विविध शेतकरी या आंदोलनात नेतृत्व करत होते.
यावेळी गिरणा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात पत्र दिले मात्र त्या पत्राचे समाधान झाले नाही. तर पालिकेने अमळनेर नगरपरिषद हद्दीतील पिंपळे
नाल्यावरील अतिक्रमण काढणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी प्रांताधिकारी तहसलिदार, मुख्याधिकारी, भुमि अधिक्षक, अमळनेर व धार-मालपुर पाझर तलाव
पुनर्भरण समितीचे सदस्य सलग्न पिंपळे नालाची पाहणी करुन वाद नसलेले अतिक्रमण पुढील १५
दिवसाच्या आत काढुन घेण्यात येईल तसेच वादग्रस्त अतिक्रमणे भुमि अभिलेख विभागामार्फत सिमांकन निश्चिती करुन काढण्यात येईल. असे पत्र दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले.
फापोरे गावाजवळ मृतावस्थेतील बोरी नदीवरील ब्रिटीशकालीन पाटचारी दुरुस्ती करून त्या पाटचारीद्वारे धार- मालपूर पाझर तलाव पुनर्भरण करण्याची कल्पना मालपूर गावाचे माजी सरपंच प्रा. गणेश पवार यांना सुचवल्याने त्यांनी समिती स्थापन करत सन २०१८ पासून निवेदने, मोर्चा, उपोषण मार्गाने सतत संघर्ष सुरू ठेवला आहे. शासनाच्या त्यामुळे संतप्त बारा गावांच्या ग्रामस्थांनी प्रा. गणेश पवार यांच्या नेतृत्वात २३ जानेवारीला प्रांत कचेरीवर बैलगाडी मोर्चा काढण्याचे निवेदन यापूर्वी दिले होते. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावर समाधान झाले नाही. जोपर्यंत ठोस पत्र ऑनलाईन येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. दरम्यान गिरणा पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ सिद्धार्थ पाटील यांनी सदर कामाबाबतचा प्रस्ताव विहीत मार्गाने मंत्रालय मुंबई येथे आधीच सादर करण्यात आलेला आहे व नियामक मंडळाची मंजूरी देखील मिळालेली आहे. तसेच प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबतचा पाठपुरावा देखील विभागीय उपविभागीय स्तरावरून मी स्वतः प्रकरणी मंत्रालयात जातीने व्यक्तीशः भेटी देत असून वरीष्ठ
कार्यालयातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधीकरण यांनी देखील प्रकरणी त्यांचे स्तरावरून योग्य ते पाठपुरावा केलेला आहे.
तरी प्रशासकीय मंजूरी मिळणे अंतीम टप्यात असल्याने प्रशासकीय मंजूरी पुढील २१ दिवसाच्या आत वैयक्तीक
पाठपुरावा करुन प्रशासकिय मान्यता मिळविण्यात येईल. तसेच पुरपाटचारीवरील अतिक्रमण धारकांना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात
येईल. तरी बैलजोडी आंदोलन व उपोषण स्थगीत करण्यास विनंती करण्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.