माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न…
१८ वर्षांनंतर भरली शाळा..

रावेर (प्रतिनिधी)
रावेर तालुक्यातील गारबड्डी धरणांच्या आवारात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
अँग्लो उर्दु हायस्कूल रावेर येथे २००५ ला दहावीत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्व प्रथम या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठनांनी करण्यात आली.यावेळी सर्वांनी आपला परिचय करून दिला.आणि एक मेकांना गाळ भेड करुन शुभेच्छा देण्यात आले.
दुपारच्या सत्रात सर्व वर्ग मित्रांचे मृत्यू पावलेले नातेवाईकांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
आणि कवी संमेलन ( मुशायरा )चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वर्गमित्र आले १८ वर्षांनंतर एकत्र गत आठवणींना उजाळा देत , भविष्यातील समाजाप्रत कर्तव्येही केली निश्चित .
रावेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल २००५ ला दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिडियाच्या ‘ माध्यमातून एकत्र येत ‘ गेटटुगेदर ‘ केला . बालपणापासूनचे वर्गमित्र आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध वाटांनी यश मिळविण्यासाठी निघून गेले . पण १८ वर्षांनंतर ते पुन्हा रावेर तालुक्यातील गारबड्डी येथे गेटटुगेदर साजरा करण्यासाठी एकत्र आले . बॅचमध्ये शिक्षक , पत्रकार, फोटोग्राफर, बांधकाम विभाग, व्यावसायिक , समाजसेवक , फार्मासिस्ट , मोबाईल शॉपी, इलेक्ट्रिशियन, व्यापारी वर्ग, सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत . समाज , शाळा , विद्यार्थी व मित्रांच्या सुख – दुःखात धावून जाण्यासाठी ‘ सोशल मीडियाचा ग्रुप स्थापन करून सर्वजण रावेर तालुक्यातील गारबड्डी येथे एकत्र जमले . गतकाळातील धमाल आठवणींना उजाळा दिला आणि भविष्यातील समाजाप्रति असलेली कर्तव्येही निश्चित केली . सर्व मित्रांचे पत्ते , फोन नंबर्स , घेण्यात आले . भविष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र परिवारासाठी तातडीचा वैद्यकीय निधी उभारणे , शाळेच्या विकासात योगदान देणे , विद्यार्थी विकासासाठी अनेकविध योजना राबविणे , नवनवीन सामाजिक उपक्रम शोधणे या बाबी निश्चित करण्यात आल्या . शेवटी कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी मुलाचे योगदान देणारे मंडळींचे मित्र मंडळींतर्फे सत्कारही करण्यात आला. शेख मुश्ताक यांनीसर्व कार्यक्रमांचे सुत्रसंचालन
केले.अज़हर मलिक यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख अकील,फरीद भाई मन्यार,महोसीन मलिक,आरीफ खान, शेख शरीफ आदिंनी परिश्रम घेतले.