अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील घटना दोषींवर कारवाईसाठी मृतदेह आणले थेट तहसील कार्यालयात

अमळनेर
(प्रतिनिधी) : तालुक्यातील मांडळ येथील वाळूच्या तस्करी करणाऱ्यांना विरोध केला म्हणून अंगावरून ट्रॅक्टर चालुन ठार केले सदरील घटनेचा मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले मांडळ येथील युवक जयवंत यशवंत कोळी (वय ३६)यांचे पायकेर शिवारात शेत असून दि.११ रोजी तो व त्याची पत्नी शुभांगी कोळी शेतात पाणी भरायला गेले होते, तेथे १.अशोक लखा कोळी, २. विशाल अशोक कोळी, ३. सागर अशोक कोळी, ४. विनोद अशोक कोळी, ५.रोहन बुधा पारधी, ६.पिंटु शिरपुरकर (पुर्ण नव माहित नाही) सर्व रा. माडंळ असे नाल्यातुन रेती भरत होते ,त्यावेळी जयवंत कोळी यांनी त्यांना 'तुम्ही दिवसा वाहतूक करा, रात्रीच्या वेळी रेती भरू नका, तुमच्या रेती वाहतुकीमुळे आमचा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याने तुमची वहीवाट नाही असे बोलून त्याचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर परत केले होते.त्याचा राग मनात धरुन त्या दिवसापासून अशोक लखा कोळी द्वेष भावनेच्या नजरेने पाहत होता. दि.१६ जानेवारी रोजी रात्री ९ वा.जयवंत कोळी हे एकटेच मक्यास पाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. ते रात्रभर शेतातच मुक्कामी होते. दि.१७ रोजी सकाळी ०७:३० वा. मांडळ गावचे शेतकरी धनराज उर्फ पिंटु झिपरू पाटील व हैबत गजमल पाटील रा. मांडळ यांनी जयवंतचा भाऊ नितीन यशवंत कोळी यांना फोन करून कळविले कि, तुमचा भाऊ जयवंत हा काटेरी झुडपात मृत अवस्थेत पडलेला आहे, त्याचे अंगात बनियान व निकर आहे. तो बोलत नाही असे कळविले .जयवंतचे कुटुंब व गावातील बरेच लोक शेताकडे गेले .तेथे त्यांच्या अंगावर बनियान व निकर येवडेच कपडे होते त्यांचा गुप्तांग फावड्याने तोडलेला व दुखापत होवुन रक्तस्राव झालेला होता शरीरावर देखील मारहाण झाल्याचे व अंगावरून ट्रॅक्टर चालविल्याचे दिसत होते.

या प्रकरणी फिर्याद मृत जयवंत ची पत्नी शुभांगी कोळी हिने मारवड पोलीस स्टेशन ला दिली असून यात सहा जणांनी त्यांचे गुप्तांग तोडून ट्रॅक्टर चालवून त्याचा खून केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. या सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारवड पोलिस स्टेशन चे एपीआय जयेश खलाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.अमळनेरचे डीवायएसपी राकेश जाधव यांनी तात्काळ पोलीस यंत्रणा कामाला लावून दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. दरम्यान जयवंत कोळीचे शव विच्छेदन झाल्यानंतर त्याचे शव नातेवाईकांनी अमळनेर तहसिल आवारात आणले होते. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय प्रेत येथून घेऊन जाणार नाही असा आक्रोश करीत नातेवाईक आरोपींची अटकेची मागणी करत होते. डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शव नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी मांडळ येथे नेले.मांडळ येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.