गटशिक्षणाधिकारी यांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा. -शिक्षक संघटना एकवटल्या,प्रांताधिकारी यांना निवेदन

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत, हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.
१६ एप्रिल रोजी गटसाधन केंद्रात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत जवखेडा येथील संस्थाचालक भटू पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांना मारहाण केली होती.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर प्राथमिक,माध्यमिक शिक्षक संघटना,विस्तार अधिकारी संघटना यांच्याकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील हल्ला हा शिक्षणव्यवस्थेवरील हल्ला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी कविता सुर्वे,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे,टीडीएफ चे संदीप घोरपडे,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कुणाल पवार,माजी मुख्याध्यापक एस.डी.देशमुख यांनी मनोगतातून निषेध व्यक्त केला.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग.स.संचालक विजय पवार,ए.टी.पाटील,मनोज माळी, वाल्मिक मराठे,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील,बापू चव्हाण,भूषण सोनवणे,आशिष शिंदे, रोहित तेले,विनोद पाटील,संभाजी पाटील,आनंदराव अहिरे,मधुकर चौधरी,संदीप वाघ,श्रीनिवास सोनवणे,गोकुळ साळुंखे,बापू पाटील तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज
तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील हल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाज केले.