पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नाही. -आमचा हेडमास्तर लई खमक्या; जयंत पाटील यांची टोलेबाजी.

24 प्राईम न्यूज 28 Apr 2024. सर्वांनी अनेक शाळा पाहिल्या आहेत. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्याने पोरं घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लई खमक्या आहे. शरद पवार म्हणजे मतांचा विषय नाही तर तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अजित पवार गटावर तुफान टोलेबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे सर्वांच्या काळजातील विषय आहे, हे मी महाराष्ट्रातील गावागावात गेल्यावर पाहतो आहे. निवडणूक प्रचारातील जयंत पाटील यांच्या भाषणाला तुफान प्रतिसाद सध्या मिळत आहे.