मालपुर येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून.

अमळनेर /प्रतिनिधी
तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर विनायक पाटील याचा शेत शिवारात खून झाल्याची घटना १९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारासघडली.
प्रभाकर विनायक पाटील यांचे प्रेत शेतात आठ वाजेच्या – सुमारास आढळून आले. त्याच्या अंगावर लाठ्या काठ्यांचे व्रण उमटल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक,पोलीस उपनिरीक्षक विनोद न पाटील, मुकेश साळुंखे यांनी भेट दिली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती असून मयताच्या मुलाने काही जणांची नावे सांगितली आहेत न मात्र पोलीस सखोल चौकशी न करीत आहेत.