मुलगी, पुतण्या असा भेद कधी केला नाही. -शरद पवार

24 प्राईम न्यूज 21 May 2024. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणात आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार यांना कायमच सत्तापदे देण्यात आली, असे सांगत शरद पवार यांनी अजितदादा गटाकडून त्यांच्यावर करण्यात येणा-या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी स्वतःच्या मुलीसाठी पुतण्या असलेल्या अजित पवार यांना डावलले,असा आरोप भाजप आणि अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला गेला. यावर एका मुलाखतीत त्यांनी या सर्व आरोपांना उत्तरे दिली. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया
सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. सुप्रियायांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही,
असे ते म्हणाले.