देशात इंडिया आघाडीचेच सरकार येईल-केजरीवाल..

24 प्राईम न्यूज 22 May 2024
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी पार पडला. या टप्प्यात इंडिया आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मोदी सरकार ४ जूनला पायउतार होणार, हे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीला स्वबळावर ३०० हून अधिक जागा मिळणार असल्याने देशात इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराधिकारी म्हणून तुमची निवड केली आहे, पण तुम्ही तर पंतप्रधान होण्याआधीच अहंकारी झालेला आहात. अमित शहा पंतप्रधान म्हणून जनतेला मान्य नाहीत. तुमचे सरकार जात असल्याने पंतप्रधान होण्याची तुम्हाला संधीही मिळणार नाही. म्हणून तुम्ही संतापाच्या भरात देशातील जनतेला शिवीगाळ केली, तर देश खपवून घेणार नाही. योगीही दिल्लीत आले होते. तुमचे खरे शत्रू तर दिल्लीतच बसले आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.