मी नार्को टेस्टला तयार-अजित पवार.

24 प्राईम न्यूज 30 May 2024. हिट अँड रन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला होता की नाही हे त्यांनी सांगावे, अन्यथा नार्को टेस्टला सामोरे जावे, असे आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवारांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, मात्र नाकों टेस्टमध्ये मी निर्दोष आढळल्यास त्यांनी पुन्हा माध्यमांपुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असे आव्हान अजित
पवारांनी दमानियांना दिले आहे. पुण्यातील अपघातावर प्रतिक्रियादेताना अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. काही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण मी रोज सकाळी उठून काम करतो, असे म्हणणारे अजित पवार अपघातानंतर सुरुवातीचे ४ दिवस गप्प होते. प्रत्येक वेळी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती? पोलीस आयुक्तांना फोन न केल्याचे म्हणणारे अजित पवार धादांत खोटे बोलत आहेत. अजित पवारांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करायला हवी, अशी मागणी दमानिया यांनी केली होती.