अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू.कॉलेज अमळनेर यांचा 10 चा निकाल 100.%

अमळनेर/ प्रतिनिधी. अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू.कॉलेज अमळनेर यांचा 10 चा निकाल 100.00 टक्के लागला आहे. परीक्षेला प्रविष्ट असलेल्या 65 विद्यार्थिनींपैकी 65 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यात 22 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 29 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
यशवंत-गुणवंत-किर्तीवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला खा साहेब, सचिव शरीफ शेख इब्राहीम साहेब, प्राचार्य नसीम बानो शेख इब्राहीम मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्रथम 86.00 % मासिरा नाज मो. मुस्ताक मन्यार दृतीय 84.40 % उजमा बी जाफर खान पठाण तृतीय 84.20 %अनम फातेमा आबिद शाह चौथा 81.80 % तन्झीला परवीन नईम कुरेशी पाचवा 81.40 % खान अर्शिया अमजद.