मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनने उडाली जगाची झोप. जगभरातील १ हजार विमाने रद्द; बँका, टीव्ही चॅनेल, शेअर बाजारातील व्यवहार ठप्प.

0

24 प्राईम न्यूज 20 Jul 2024.. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचा सव्र्व्हर डाऊन होताच जगभरातील सेवा पुरवठादार कंपन्यांची झोप उडाली. बँकांपासून रेल्वे, विमान वाहतुकीपर्यंतच्या अत्यावश्यक सेवा, टीव्ही रेडिओचे प्रसारण, शेअर बाजार, अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले, अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये १ हजारांहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर ३ हजारांहून अधिक विमानांचे वेळापत्रक बिघडले. भारतात इंडिगो, स्पाईस जेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या एअरलाईन्सला या सर्व्हर डाऊनचा फटका बसला. या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाईट अपडेट सेवा प्रभावित झाल्या. विमानतळावर सेवा मिळत नसल्याने प्रवाशांचाही खोळंबा झाला. अनेक युजर्सकडून हा सायबर हल्ला असल्याचेही दावे करण्यात आले. भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी मायक्रोसॉफ्टशी या विषयावर संपर्क साधून माहिती घेतली.मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत ब्लॉग पोस्टनुसार जेव्हा विडोजमध्ये गंभीर समस्या उद्‌भवते तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्वरित शटडाऊन किंवा रिस्टार्ट करावी लागते. यामुळे वापरकत्यांना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) सारखे तांत्रिक समस्येचे संदेश दिसतात. त्याचवेळी अँटीव्हायरस क्लाउड स्ट्राईकने या तांत्रिक समस्येमागील कारण ओळखल्याचे म्हटले जात आहे. क्लाउड स्ट्राईकने शुक्रवारी जागतिक स्तरावर एक अपडेट जारी केले होते, ज्यामुळे वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. सर्व सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची टीम या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे क्लाउड स्ट्राईकने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!