गैरसमजुतीतून एकमेकांपासून पाच वर्षे लांब गेलेले दोन जोडपे आले एकत्र… -शनिवारी झालेल्या लोक अदालतीत १ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली…

अमळनेर /प्रतिनिधी एकमेकांपासून पाच वर्षे लांब गेलेली दोन जोडपी लोक अदालतीमुळे पुन्हा सुखाने नांदायला तयार झाले. शनिवारी लोक अदालतीत १ हजार २१२ प्रलंबित खटल्यांपैकी १०६ खटले निकाली निघाले, एकूण १ कोटी ८९ लाख ७४ हजार ३५१ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच २ हजार ३७३ वादपूर्वखटल्यांपैकी ३१ खटले निकाली निघाले त्यात ३० लाख ९७ हजार २५० रुपयांची वसुली झाली. मात्र नगरपालिकेच्या ९६ थकबाकीदारांना वाटाघाटी करण्यासाठी लोक अदालतीत बोलावण्यात आले होते. मात्र पालिकेने तडजोडीची भूमिकाच घेतली नाही.न्या. व्ही. बी, गव्हाणे, अॅड. व्ही. वाय, बडगुजर, न्या. पी. पी. देशपांडे, अॅड.आर. आर. पाटील होते. न्या. एन. आर. येलमाने, अॅड. संदीप डामरे, न्या. ए. यू., यादव, अॅड. माधुरी ब्रह्मे होत्या. लोक अदालतमध्ये वकील संघाचे अॅड. विलास वाणी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वाय. पी. पाटील, उपाध्यक्ष नंदलाल व्ही. सूर्यवंशी, अॅड, जितेंद्र साळी, किशोर बागूल, शशिकांत पाटील, राजेद्र चौधरी आदी उपस्थित होते.