मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन.                        -सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे.

0

अमळनेर/ प्रतिनिधी

अमळनेर येथील सर्व आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव यांच्यात मनोमिलन झाले असून या निर्णयाचे आम्ही सर्व आजी,माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी दिली.
दि 29 रोजी राजवड येथे साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी हे मनोमिलन घडून यावेळी आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात बऱ्याच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभा तर साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेत नेतृत्व अशी आमची सर्वांची इच्छा असून तसा आग्रह आम्ही साहेबराव पाटील यांना धरल्याने निश्चितच ते देखील सकारात्मक राहतील असे त्यांनी सांगितले,याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरी यानिमित्ताने दोघांमध्ये दिलजमाई झाली हे मात्र निश्चित आहे आणि यातून चांगलेच घडेल यात शंका नाही.सदर भेटी प्रसंगी मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील,काही माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच अनिल पाटील यांनी यावेळी साहेबराव पाटील यांचे सह माजी नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे आशीर्वाद देखील घेतले असून त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील मजबूत पाठबळ देण्याचे सकारात्मक संकेत अनिल पाटलांनी दिल्याने आम्ही सर्व नगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे मनोबल वाढले असून कोणत्याही परिस्थितीत अनिल पाटलांना आमदार करण्याचा निर्धार आम्ही सर्वानी व्यक्त केला आहे.या भेटीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असल्याने अनेकांनी याचे स्वागत केले आहे.मंत्री अनिल पाटील यांनी मतदारसंघात जो भरघोस विकास केला तो जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून साहेबराब दादांची आमदारकी नंतर नगरपरिषदेतील कारकीर्द सर्वानी अनुभवली आहे.यामुळे दोन्ही नेते एक सोबतच आम्हाला व जनतेलाही हवे असल्याने आम्ही सर्वानी हे मनोमिलन घडवून आणले असल्याची माहिती विनोद लांबोळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!