राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष.’

24 प्राईम न्यूज 31 Jul 2024. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने नुकताच काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य समितीने या आदेशाचे स्वागत केले आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीसमहानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षात जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी या पत्रकाद्वारे कळविले आहे.