राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ बिर्गेड चा आगळा वेगळा कार्यक्रम….

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल मकरसंक्रांत म्हणजे तीळगुळ-हळदीकुंकू आदी कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच… साचेबध्द, ठरलेले कार्यक्रम परंतू या सर्व गोष्टींना फाटा देवून एरंडोलच्या महिला मंडळ, राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेडने आगळावेगळा कार्यक़्रम घडवून आणला. यावेळी हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, स्त्रीभ्रूणहत्या, मुलगा-मुलगी भेद करणार नाही, अंधश्रध्दा निर्मूलन यासाठी प्रतिज्ञा कार्यक़्रम संपन्न होवून मन्हा धोंड्यानं लगीन या विनोदी नाटीकेने धम्माल उडवून दिली.
एरंडोल येथील साई-गजानन मंदिरात 26 जानेवारी (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त) रोजी संपन्न झालेल्या कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका शशिकला जगताप होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून जिजाऊ ब्रिगेड जळगांव जिल्हाध्यक्षा लीना पवार, समुपदेशक ज्योती पाटील, जयश्री पाटील, अरूणा गरूड, सुचिता साळूंखे (शिक्षीका) सर्व जळगांव उपस्थित होत्या.
कार्यक़्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले प्रतिमापुजन, दीपप्रज्वलन करून जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी खडतर जीवन जगून परिवार सांभाळणार्या 5 रणरागीणींचा साडी, जिजाऊ प्रतिमा, पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. त्यांची नावे अशी निर्मला शिवाजी पाटील, शारदा बापू पाटील, जिजाबाई भानुदास पाटील, वंदना मधुकर पाटील, सुचेता साळूंखे (मॅडम). यावेळी लीना पवार यांनी जिजाऊ ब्रिगेडची संकल्पना, उद्देश, आवश्यकता, जिजाऊंचे विचार घरोघरी पोहोचविणेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मन्हा धोंड्यानं लगीन ही कौटूंबिक विनोदी नाटीका मनिषा पाटील, सुचेता साळूंखे, वंदना पाटील यांनी सादर करून धम्माल उडवून दिली. उपवर मुलांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाल्याचे सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आले. ज्योती पाटील यांनी अंधश्रध्दा निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात शशिकला जगताप यांनी बेटी बचाव-बेटी पढाव संदेश देवून मुलींचा गर्भपात करू नका बाबत महिलांची मने जिंकली. घरोघरी शौचालय, पर्यावरण, परिसर स्वच्छता, घंटागाडी वापर आदींबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शहरातील महिला मंडळ पदाधिकारी नगरसेविका जयश्री पाटील, आरती महाजन, आरती ठाकूर, कोकिळा इंगळे, शोभा साळी, मीना मानुधने, रश्मी दंडवते, अंजूषा विसपुते, संध्या महाजन, दर्शना तिवारी, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मीना काळे, कुसूम पाटील, इंदिरा पाटील, उषा पाटील, डॉ. गायत्री पाटील, आरती पाटील, अनिता चव्हाण, रंजना पाटील, शकुंतला पाटील, अन्नपूर्णा पाटील, लता पाटील, अरूणा पाटील, शोभा पाटील, कवयित्री मंगला रोकडे, मनिषा पवार, सुरेखा पाटील, छाया पाटील आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी स्वाती पाटील, मधुरा पाटील, पुजा भांडारकर, सुरेखा पाटील, लता मराठे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रायोजक (भोजन-वाण) डॉ. गायत्री पाटील यांचा जिजाऊ प्रतिमा, साडी देवून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेडसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी स्वादीष्ट भोजनाने कार्यक़्रमाची सांगता झाली.