मनरेगाअंतर्गत ग्रामरोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन सुरू — मानधनाच्या प्रतीक्षेत संतप्त सेवक…

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आजपासून मनरेगांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.
संघटनेचं म्हणणं आहे की, ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन 2 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालं असतानाही, आजपर्यंत हे मानधन ग्रामरोजगार सहाय्यकांना वितरित करण्यात आलेलं नाही.
या अन्यायाविरोधात संघटनेच्या पुढाकाराने सुरेश पाटोळे (जिल्हाध्यक्ष), महेंद्र पवार (जिल्हा संघटक), वाल्मीक पाटील (जिल्हा सल्लागार), रविंद्र बाविस्कर (तालुका अध्यक्ष) यांच्यासह अनेक सेवकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, ‘मानधन मिळेपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील’, असा इशारा दिला आहे.
संघटनेने आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी गटविकास अधिकारी, अमळनेर यांना निवेदन सादर केलं असून, सेवकांच्या पोटापाण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला जात असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.