अमळनेर तालुक्यात पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक; उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांचे निर्देश..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यात आगामी संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस ग्रामसेवक, MSEB अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, तहसीलदार आणि मनरेगा कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
टँकरफेड गावांमध्ये सार्वजनिक पाणवठ्यांची नोंद घेऊन त्या परिसरात जलताऱ्यांची योजना आखणे
मनरेगा अंतर्गत जलतारा कामांची अंमलबजावणी गतीने करणे
पूर्णत्वास आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन संदर्भातील अडचणी सोडवणे
विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून टंचाई काळातील नियोजन आखणे
उपविभागीय अधिकारी श्री. मुंडावरे यांनी प्रशासनास निर्देश दिले की, गाव पातळीवर सजग राहून नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात.