मुर्शिदाबाद व नीमच घटनेचा वक्फ बचाव समितीतर्फे तीव्र निषेध. -मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्या मागणी

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील वक्फ विरोधी आंदोलनातील तीन तरुण पोलीस गोळीबारात ठार झाल्याबद्दल तसेच मध्य प्रदेश येथील नीमच घटनेत जैन धर्मगुरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध ऑल इंडिया पर्सनला बोर्ड दिल्ली शी संलग्न जळगाव वक्फ बचाव समिती तर्फे करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
वक्फ बचाव समितीने महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी जळगाव मार्फत निवेदन दिले असून या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध करून मुर्शिदाबाद येथील मयत तिघा तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये भरपाई, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व दोन्ही घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सदरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना मुफ्ती खालीद , मुफ्ती रमिज, यांच्या हस्ते देण्यात आले.
वक्फ बचाव समितीचे सदस्यांची होती उपस्थिती
सदर निवेदन देताना समितीचे मुफ्ती खालीद , मुफ्ती रमिज, मौलाना उमेर, मौलाना रहीम पटेल, मौलाना वसीम पटेल, मौलाना कासिम, फारूक मौलाना साजिद, फारुख शेख, मतीन पटेल , अनिस शहा, मजहर पठाण, अन्वर खान, रिजवान बागवान, इमरान शेख, नजमोद्दीन शेख, शेख फारूक लुकमान आदींची उपस्थिती होती.