प्लेटलेट दान करून प्रियांका जाधवला दिला नवसंजीवनीचा आधार!

आबिद शेख/अमळनेर
सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या प्रियांका जाधव या बहिनीसाठी अयाज मोहसीन यांनी प्लेटलेट्स डोनेट करून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला आहे. त्यांनी डॉ. मिन्हाज पटेल सरांशी चर्चा केली असता, डॉ. पटेल यांनी सांगितले की पेशन्टची तब्येत सध्या स्थिर आहे.
“रक्त दान – श्रेष्ठ दान,
प्लेटलेट दान – महान दान”
या विचारांना मूर्त रूप देत अयाज मोहसीन यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. ते A पॉझिटिव्ह ग्रुपचे असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे – 9595529600.
प्लेटलेट दान करा, आणि कुणाच्या तरी आयुष्यात आनंद भरा!