संविधान जिंदाबाद घोषणे सह बाबासाहेब व सुप्रीम कोर्टाचे वक्फ बचाव समितीने मानले आभार..

0

24 प्राईम न्यूज 18 April 2025

सुप्रीम कोर्टात वक्फ कायदा २०२५ च्या विरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान भारत सरकार तर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल यांनी अंडरटेकिंग दिले की सदर कायद्यातील वक्फ बाय यूजर, राज्य व केंद्र सरकार मंडळ तसेच वक्फ च्या संपत्ती बाबत काही एक कारवाई करणार नाही असे अंडरटेकिंग दिल्याने सदर वक्फ कायद्याची तात्पुरत्या स्वरूपात अंमलबजावणी होणार नसल्याने जळगाव वक्फ बचाव समिती तर्फे माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार संविधान जिंदाबाद चे घोषणा देऊन व्यक्त करण्यात आले.

असविधानिक कायद्याला विरोध
सदर कायदा हा संविधानाच्या कलम १४,२५,२६,३०० ए च्या विरोधात असून त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी लोकसभा व राज्यसभेतील खासदार तसेच भारतातील सुमारे एक करोड लोकांनी जेपीसी कडे केली असताना सुद्धा तो असविधानिक कायदा भारत सरकारने संख्याबळाच्या आधारे पास केलेला आहे.

कायद्याची तूर्त अंमलबजावणी होणार नाही
भारत सरकारने संख्याबळाच्या आधारावर लोकसभा व राज्यसभेत वक्फ संशोधन सुधारणा बिल २०२४ मंजूर करून उम्मीद या नावाने २०२५ चा कायदा अमलात आणण्याचे गॅझेट ९ एप्रिल ला प्रसिद्ध केल्याने त्या विरोधात सुप्रीम कोर्टात ३७ पिटीशन दाखल झालेले आहेत.
सदर पीटिशन वर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारले त्यावर आज भारत सरकार तर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल यांनी लेखी अभिवचन दिले की जोपर्यंत कोर्टात अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही सदर कायद्याची अंमलबजावणी करणार नाही.
त्यामुळे सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला सात दिवसात आपले म्हणणे मांडावे तोपर्यंत कायद्यावर कोणतीही कार्यवाही करू नये असे आदेश दिलेले आहे
वक्फ बचाव समिती चे मेंबर होते उपस्थित”

जळगाव वक्फ बचाव समितीने सदर निकाल ऐकताच भर दुपारी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन संविधान लिहिणाऱ्यांचे आभार मानून त्यांचे अभिवादन केले.
त्यावेळी मुफ्ती रमीज, मौलाना कासिम ,मौलाना रहीम पटेल,हाफिज निजाम, मतीन पटेल , जफर मिर्झा, एडवोकेट आमिर शेख, हारून खाटीक, सय्यद चांद,अनिस शहा , इमरान शेख , नजमुद्दीन शेख, मुजाहिद खान , कासिम उमर रऊफ टेलर , लतिफ सैयद आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!