नंदुरबार काँग्रेसला मिळणार गतवैभव? निरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न..

24 प्राईम न्यूज 18 April 2025
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक नंदुरबार येथे काँग्रेस निरीक्षक अॅड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे संघटन, कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर भर देण्यात आला

“मरगळ झटकून आणि सामंजस्याने काम केल्यास नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा आपले गतवैभव प्राप्त करू शकतो,” असे निरीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेस ही 140 वर्षांची परंपरा असलेली संघटना आहे आणि तिचे बळ वाढवण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी अधिक वेळ देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या संघटनासाठी जनसंपर्क वाढवणं, बुथ पातळीवर रचना बळकट करणं, आणि आपापसातील मतभेद दूर ठेवून पक्षकार्यात लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
या बैठकीत माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मत मांडताना, “जिल्ह्यात काँग्रेसचे प्रचंड मतदार आहेत. फक्त नेतृत्वाची गरज आहे. विरोधी पक्षातील मातब्बरांना धक्का देत नवे स्थान निर्माण करा,” असा सल्ला दिला.
कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी, “जे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, ते काँग्रेसचे एकनिष्ठ नाहीत. पक्षासाठी काम करणाऱ्यांनाच पुढील जबाबदाऱ्या दिल्या जातील,” असे ठाम मत व्यक्त केले.
सुहास नाईक यांनी, “आजच्या बैठकीला झालेली कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून नवचैतन्य निर्माण झालं आहे. जे काँग्रेस सोडून गेलेत त्यांच्यावर लक्ष देऊ नका, पक्ष मजबुतीसाठी संघटित व्हा,” असा संदेश दिला.
या बैठकीस निरीक्षक अॅड. संदीप पाटील, राजेंद्रकुमार गावित, दिलीप नाईक, सुहास नाईक, देवाजी चौधरी, पंडित मरोठ, एजाज बागवान, खान मॅडम, राजेंद्र पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, जिल्हा काँग