धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवनी गांगुर्डे यांची निवड. — अक्कलपाडा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव..

24 प्राईम न्यूज 18 एप्रिल 2025
अक्कलपाडा (ता. अक्कलकुवा) येथील शुभम गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी मधुकरराव गांगुर्डे यांची धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अक्कलपाडा येथे मोठ्या उत्साहात अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अनंत तोरवणे, अक्कलपाडा संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव गांगुर्डे, वैशाली अमृतकर, सुनील अमृतकर तसेच एसटी महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस एस. टी. पाटील हेही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी संजीवनी गांगुर्डे यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.