नंदुरबारमध्ये महात्मा फुलेंना अभिवादन; ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण..

24 प्राईम न्यूज 12 April 2025
नंदुरबार – येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता माळीवाडा परिसरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, प्राचार्य फय्याज खान पठाण, निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रताप सोनवणे, ऍड. मजहर शेख, सामाजिक कार्यकर्ते अजहर मियाँ पिरजादे, माजी नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संभाजी माळी, बाबू शेख (ठेकेदार), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नंदुरबार शहर उपप्रमुख छन्नु शाह पठाण, अजीम बागवान, सामाजिक कार्यकर्ते राजू मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.