सोनगीर पोलिसांची अमली पदार्थ विरोधात कारवाई—१८७,२०० रू. किमतीचा गांजा जप्त..

0

सोनगीर (सतार खान)सोनगीर फाटयावर एक इसम याहमा एफ झेड मोटार सायकलवर गोणी बांधुन शिरपुर कडून धुळे कडे जातांना दिसल्याने त्याचा गस्तीवर असलेले पोलीस वाहनावरील कर्मचारी यांना संशय आल्याने त्यांनी त्यास थांबवुन त्यास चेक केले असता त्याचे मोटार सायकलवर असलेल्या गोणीत गांज्या सदृश्य अंमली पदार्थाचा नाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात सदर मालाचे वर्णनाचा व किंमत खालील प्रमाणे

1) १,०७,२०० /- रुपये किंमतीचे एकुण १३.४०० कि. ग्रॅम गांज्या सदृश्य अंमली पदार्थाचा माल 2) ८०,०००/- रुपये किंमतीची एक काळी व हिवरट रंगाची यामाहा एफ. झेड. मोटारसायकल क्र. MH १८ BB ९६४७ जु.वा. कि.अं.

१,८७,२०० /- रुपये (एक लाख सत्त्यांशी हजर दोनशे रुपये मात्र) एकुण किंमत वरील प्रमाणे माल मिळुन आले आला तसेच सदर मोटार चालक नामे फिरोजअली शाकीर अली सैयद वय ४४ वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार- सत्तार का वाडा, कबीरगंज, वडजाई रोड, धुळे असे

विरुध्द सोनगीर पो.स्टे.ला पोना/नरेंद्रसिंग गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे

कलम २० व २२ प्रमाणे कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास

पो.स.ई./रविंद्र महाले हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश फड, पि एस आय,रविंद्र महाले, पि एस आय संदीप दरवडे, पि एस आय विजय चौरे, असई, अजय सोनवणे पोहेकॉ ,संजय देवरे, पोना, नरेंद्र गिरासे, सुरजकुमार सावळे, कमलेश महाले, रामकृष्ण बोरसे अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!