समाजात माणुसकीचा दिवा: मुस्लिम तरुणाकडून अनाथ व लावारसांसाठी जेवणाची सेवा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर– जात, धर्म, वय किंवा परिस्थिती यापलीकडे जाऊन माणुसकीचं जिवंत उदाहरण अमळनेर तालुक्यात घडले आहे. वेला (ता. चोपडा) येथील मानो सेवा तीर्थ या संस्थेमध्ये अमळनेर येथील मुस्लिम तरुण आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर अजहर शब्बीर पठाण यांनी एक प्रेरणादायक पाऊल उचललं. त्यांनी 138 वेगवेगळ्या जातीय आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या अनाथ व लावारस व्यक्तींना एका वेळचं जेवण पुरवलं.
या उदात्त उपक्रमात त्यांना इंजिनीयर इमरान शेख आणि जियाउल हक यांची मोलाची साथ लाभली. या तिघांनी मिळून केवळ अन्नवाटप केले नाही, तर समाजात माणुसकी, एकोप्याचा आणि आपुलकीचा संदेशही दिला.
अजहर पठाण यांचं हे कार्य सिद्ध करतं की “माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही.” समाजात भाईचाऱ्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.