पदवीधर मदारसंघा साठी एकुन ५०.७९ टक्के मतदान.. मतदारांची नावे आणि फोटो चुकल्याने गोंधळ..

0

अंमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यात ३३४५ पैकी १६९९ म्हणजे ५०.७९ टक्के मतदान झाले.
पदविधरांचे मतदान असले तरी शिक्षकांचा बोलबाला होता. सत्यजित तांबे व शुभांगी पाटील या दोन बुथवर गर्दी झाली होती. प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय आणि राजसारथी कार्यालय असे तीन मतदान केंद्र होती. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार असले तरी त्यांच्या बुथवर काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजप पुढार्यांनी हजेरी लावली होती. तर काही काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांच्या बूथ वर ठाण मांडले होते.
दुपारी अडीच वाजेपासून मतदारांची गर्दी वाढली होती. तिन्ही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी चार वाजेची वेळ संपताच रांगेतील मतदारांना उलट्या क्रमाने नंबर चे टोकन वाटले.


मतदान केंद्रावर आलेल्या अनेक मतदारांना त्यांची नावे आणि फोटो चुकल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले तर काहींची नावे अमळनेर ऐवजी जळगाव केंद्रावर दाखवत होते. महिलांच्या बाबतीत माहेर कडचे नाव आणि सासरकडचे नाव यामुळे आधार कार्ड ,मतदान कार्ड आणि मतदार यादीत तफावत आढळून आल्याने गोंधळ उडत होता.


शासनाने विशेष नैमित्तिक रजा जाहीर केल्यानन्तरही अनेक शाळांच्या मुख्यध्यपकांनी शिक्षकांना मतदानासाठी उशिरा सोडल्याने काहींना मतदान न करता माघारी फिरावे लागले. पदवीधर मतदार असतानाही कोणत्या केंद्रावर नाव आहे याचा घोळ मतदार करत होते. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , तालुका कृषी अधिकारी भारत वारे , सुधीर पाटील ,रितुल सोनवणे , धनंजय सुर्यवनशी , दिनेश घुले , किशोर पाटील ,धीरज पाटील यानी निवडणूक कामी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!