आयटा रावेर युनिटा तर्फे बक्षीस वितरण समारंभ..

0


रावेर ( प्रतिनिधी ) : येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे सीरत उन नबी (स.अ.स) कुईज परीक्षा स्पर्धा १६/१०/२०२२ रोजी घेण्यात आली होती . या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून यशस्वी झालेले विद्यार्थ्यांना ट्राफी , बक्षीस,
प्रमाण पत्र वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठनांने करण्यात आली . स्पर्धाचे बक्षीस वाटप रावेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर येथे संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेर तालुका उर्दु एज्युकेशन सोसायटीचे चे अध्यक्ष एडवोकेट एस एस सय्यद होते.या प्रसंगी
शेख आरीफ, सैय्यद आरीफ,सलाउद्दीन भाई, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख, एन एन तडवी हायस्कूल पाल चे उप शिक्षक एजाजोद्दीन शेख
खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल चे मुख्याध्यापक नीसार शेख ,जि.प.उर्दु प्राथमिक शाळा कर्जोद चे मुख्याध्यापक हनीफ अब्दुल सत्तार,जि.प.उर्दु. प्राथमिक शाळा रसलपुर चे मुख्याध्यापक शेख कलीम शेख गमीर, नसीम खान, आर एस टेलर आदी
उपस्थित होते . यावेळी प्रथम गटातील तीन स्पर्धकांना व दुसऱ्या गटातील तीन स्पर्धकांना प्रथम दुसरे व तिसरे पारितोषिक वितरण करण्यात आले .यात गट पहिला उमेमा तहरिम शेख वसीम खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल ( प्रथम ) महेक बी शेख आबीद अँग्लो उर्दु हायस्कूल ( दुसरा ) मिसबा नाज़ आसीफ मोहम्मद गर्ल उर्दु हायस्कूल ( तिसरा ) तर दुसऱ्या गटात रिदा फातेमा वाहेद खाटीक अलहसनात उर्दु प्राथमिक शाळा ( प्रथम ) अलीज़ा फातेमा एजाजोद्दीन गर्ल उर्दू हायस्कूल ( दुसरा ) आफिया फातेमा अब्दुल खालीद मन्यार,अँग्लो उर्दु हायस्कूल ( तिसरा ) असे स्पर्धा विजेत्यांची नावे असून यावेळी एडवोकेट एस एस सय्यद शेर अफगन यांनी शिक्षणाचे महत्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलक युनुस यांनी केले . यशस्वीतेसाठी ऑल इंडिया आयडिया टीचर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम ,सचिव सलमान अली, मोहम्मद शफीक, फरहान अहमद, मोहसीन खान,
मोहम्मद जुनेद , जुबेर अहमद , शेख सादीक ,अकरम खान,आदींनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!