आरोपी आहे म्हणून घर कसे पाडता ?सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल..

0

24 प्राईम न्यूज 3 Sep 2024. फौजदारी प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्यांची घरे बुलडोझरच्या सहाय्यानजमीनदोस्त करण्याच्या विविध राज्यांमध्ये घडलेल्याप्रकारांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला. केवळ
आरोपी असल्याच्या कारणावरून एखाद्याचे घर जमीनदोस्त कसे केले जाऊ शकते, असा सवाल
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने
केला आणि घर अथवा एखादे बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबत देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित करण्याचे स्पष्ट केले. तथापि, कोणत्याही अनधिकृत बांधकामाला आम्ही संरक्षण देणार – नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने स्पष्ट केले.आणि न्या. के. व्ही विश्वनाथन यांच्या पीठाने पाडकाम कारवाईविरोधात करण्यात आलेल्या याचिकांच्या अनुषंगाने सांगितले.

कोणत्याही अनधिकृत बांधकामाला आम्ही संरक्षण देणार नाही, घर अथवा एखादे बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबत देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित करण्यात येतील, असे पीठाने स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी घेण्याचेही पीठाने मुक्रर केले. उत्तर प्रदेशसह देशातील तीन राज्यांमध्ये सातत्याने बुलडोझर कारवाई केल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला लक्ष्य

जमियतने दाखल केलेल्या याचिकेद्वारे आरोप केला आहे की, अशा प्रकारच्या कारवाया करून देशातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्यास सरकारवर बंदी घालण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाला अर्ज देखील दिला आहे. खटला सुरू व्हायच्या आधीच घरांवर बुलडोझर फिरवला जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मे महिन्यात मध्य प्रदेशमधील एका आरोपीच्या वडिलांच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच तेथील प्रशासनाने तातडीने आरोपीच्या वडिलांचे घर पाडले, आरोपी गुन्हेगार सिद्ध होण्यापूर्वीच अशा प्रकारची कारवाई केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, महाधिवक्त्यांनी दिल्लीमधील जहांगीरपुरी येथील कारवाईचा उल्लेख केला. त्यावर न्यायमूर्ती गवई यांनी प्रश्न उपस्थित केला की एखादी व्यक्ती केवळ आरोपी आहे या आधारावर सरकार किंवा प्रशासन त्याच्या घरावर बुलडोझर फिरवू शकते का, हे कायद्याविरोधात आहे. याबाबत आम्ही कठोर निर्देश जारी करू आणि सर्व राज्यांना नोटीसही बजावू, असेही पीठाने म्हटले आहे.फौजदारी प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्यांची घरे बुलडोझरच्या सहाय्यानजमीनदोस्त करण्याच्यविविध राज्यांमध्ये घडलेल्याप्रकारांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेसवाल उपस्थित केला. केवळआरोपी असल्याच्या कारणावरून एखाद्याचे घर जमीनदोस्त कसे केले जाऊ शकते, असा सवा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने
केला आणि घर अथवा एखादे बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबत देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावि करण्याचे स्पष्ट केले. तथापि, कोणत्याही अनधिकृत बांधकामाला आम्ही संरक्षण देणार – नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!