दोंडाईचा शहरात सार्वजनिक मंडळाकडून गणेश मुर्तीची उत्साहात स्थापना.

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. दोंडाईचा शहरात आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून आला. अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
रिक्षा, मालवाहू टेम्पो, कार आणि मोटरसायकलींवरून भक्त गणेशमूर्ती घरी घेऊन येत होते. छ. शिवाजी महाराज चौकात भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून गेले होते.आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण पाहायला मिळत होता. ढोल-ताशांचा गजर, फुलांची व फुगे उधळण करत मूर्तीवर करण्यात आले होते.
वास्तव ग्रुप गणेश मित्र मंडळ आणि बापजी ग्रुप गणेश मित्र मंडळ व छ.शिवाजी चौकचा राजा असा तिन्ही गणपती बाप्पा समोर समोर एकमेकांची आरती करण्यात आली. छ.शिवाजी महाराज चौकात भक्तांची मोठी गर्दी दिसली. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मूर्ती मंडळांमध्ये नेल्या.सार्वजनिक गणेश मंडळांतील बाप्पा थाटामाटात स्थानापन्न झाले. बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय झाले.