तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून आश्रमशाळा पिंपळे बु.येथील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड……

आबिद शेख/अमळनेर
सोमवार रोजी अमळनेर तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सु.अ.पाटील प्राथमिक/ यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.ता- अमळनेर, जि- जळगाव येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून सर्व विजयी खेळाडूंची जळगाव जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर खेळाडूंना उच्च माध्यमिक शिक्षक स्वप्निल एच.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत 100 मी, 200 मी, 400 मी, 800मी,1500 मी, 3000 मी धावणे, 4×100 मी, 4×400मी रिले, गोळा फेक, लांब उडी अशा विविध क्रीडा प्रकारात आश्रमशाळेतील एकूण 24 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यातील 22 खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. यादरम्यान अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री.सुनील वाघ यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी पिंपळे बु.येथील अध्यक्षा माईसो सौ.विद्याताई पाटील व सचिव नानासो श्री.युवराज पाटील साहेब, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री.उदय पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.