शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. -संजय राऊत

24 प्राईम न्यूज 10 Sep 2024. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे ? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे, असं संजय राऊतम्हणालेत. २०१९ साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतंहे फडणवीस यांना कळलं नव्हतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना. आता २०२४ साली तुमच्यात हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर हे समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.