विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही — -अफवांवर विश्वास ठेवू नका —— जिल्हाध्यक्ष –बाळासाहेब पवार. -अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा ——

0

अमळनेर /आबिद शेख
येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून निर्णय झालेला नाही.त्यासंबंधी अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. असे काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक ता.9 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात घेण्यात आली.त्यावेळ त्यांनी सांगितले.
या बैठकीला तालुक्यातील व शहरातील सर्व बुथ प्रमुखांना बोलावण्यात आले होते. यावेळी 275 ते 340 बूथ प्रमुखांसह महिलांची उपस्थिती होती.
मुंबईच्या काँग्रेसच्या सभा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे आदेश यांचे पालन करताना, संपूर्ण जळगाव जिल्ह्याची परिस्थिती, आढावा यावेळी बाळासाहेब प्रदीप पवार यांनी सांगितला.
याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर नाना कोळी, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील,जळगाव जिल्हा काँग्रेस व्ही जे एन टी चे अध्यक्ष सुभाष जाधव, धरणगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनंत परिहार, यांच्यासह विधानसभेसाठी इच्छुक श्री. के. डी ल.पाटील, श्री. संदीप घोरपडे यांची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर बूथ प्रमुखांच्या मेळावा घेतला जात आहे.त्याची सुरुवात जिल्ह्यात सर्वप्रथम अमळनेर तालुक्यापासून होत आहे. सर्वांनी अगदी मनापासून काम केल्यास लोकसभेसारखे यश आपल्या पक्षाला मिळेलच असेही बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात बूथ प्रमुखांचे महत्व व त्याच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. शहराध्यक्ष श्री. मनोज पाटील यांनी तालुका व शहर काँग्रेस कमिटीची भूमिका स्पष्ट करताना आम्ही महाविकास आघाडीचे पाईक असून, तंतोतंत आघाडी धर्म पाडणार असल्याने, आमदारकीची शिफारस कोणालाही झाली तरी काँग्रेस पक्ष भक्कमपणे त्याच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा राहण्याचे त्यांनी सांगितले. व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष जाधव यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी लोकसभेच्या मतदाना वेळी उत्कृष्ट प्रकारे बूथ सांभाळल्याबद्दल श्रीमती शोभा गढरे व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नगरसेवक राजू संदानशिव यांचा सत्कार करण्यात आला.
बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यात प्रसाद कापडे खवशी, विवेक पाटील लोण, माजी सरपंच ढेकू, तुकाराम चौधरी नीम , लोटन पाटील तरवाडे, यांनी यावेळी सूचना केल्या. बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, गोकुळ आबा बोरसे, काकाजी देशमुख, प्रा शाम पवार, राजू दादा फापोरेकर,गजेंद्र साळुंखे, मेघराज पवार, अलीम मुजावर, तुषार संदानशिव, राजू संदानशिव, महेश पाटील, विठ्ठल पवार, अशोक पाटील, , राजू दादा फापोरेकर, पार्थ राज पाटील, विवेक पाटील, प्रवीण जैन, अनिल पाटील, वसंतराव पाटील, अमळनेर शहर महिला अध्यक्ष श्रीमती नयना पाटील, वैशाली मोरे, दास भाऊ, तनवीर शेख, अनवर खाटीक, अल्ताफ शेख, विवेक पाटील, देविदास पाटील, रोहिदास दाजी, लोटन अण्णा चौधरी, दिलीप पाटील, राजू भाट, प्रवीण जैन, विश्वास पाटील, अमित पवार, बंशीलाल पाटील, डॉक्टर एन बी बागुल, कैलास कोळी, भगवान संदानशिव, विशाल परदेशी, गुलाब पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, पुनीलाल पाटील, पवन शिंदे, सलीम शेख, गौतम भोई, ज्ञानेश्वर कोळी, मधुकर पाटील, अनिल पाटील. इत्यादी इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!