राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई विभागाने १० व पुणे ने ४ पदक पटकाविले–
संस्कृती,अक्षय, आदिती व गौवरंग ने प्रथम क्रमांक पटकाविला..

जळगाव (प्रतिनिधि) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवार 31 जानेवारी रोजी समारोप झाला.
यावेळी प्रत्येक गटातील पाच मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. अशा या २० पदका मध्ये मुंबई ने १०, पुण्याने ४,अमरावती ने २ तर औरंगाबाद, कोल्हापूर,नाशिक,नागपूरने प्रत्येकी एक चषक प्राप्त केले.
पारितोषिक वितरण समारंभ

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अविनाश जैन ,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व मुख्य पंच स्वप्निल बनसोड यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताळे व यशवंत बापट, जिल्हा संघटनेचे नंदलाल गादिया एडवोकेट अंजली कुलकर्णी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी व संजय पाटील आदींची उपस्थिती होती.
अविनाश जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्या दिल्या क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी समारोपीय प्रस्तावना सादर केली फारूक शेख यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला प्रवीण ठाकरे यांनी सूत्र संचालन तर मीनल थोरात यांनी आभार मानले.
वयोगट प्रमाणे प्रथम पाच व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
सतरा वर्ष आतील मुली
वानखेडे संस्कृती व पच्चीगर आहना अमरावती, आदिती कायल पुणे, श्रुती काळे औरंगाबाद व सृष्टी हिप्परगी कोल्हापूर
मुले
अक्षय बोरगावकर पुणे, ओम कदम, वेदांत वेखंडे, अय्यर अरविंद,अक्षीत झा, सर्व मुंबई
१९ वर्षा आतील मुली
वावल अदिती पुणे, सृष्टी राका नाशिक, ऐशिता चाबरा नागपूर, कीर्ती मयूर व सृष्टी त्रिपाठी मुंबई
मुले
गावरान बागवे, पोटावद अनिरुद्ध, नगरकट्टे वेदांत, रचित गुरनानी सर्व मुंबई व ओम नागनाथ पुणे.