तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

भुसावळ (प्रतिनिधि) तालुक्यातील साकरी येथिल तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज रंगेहाथ पकडल्याने खडबड उडाली या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, साकरी येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी तक्रारदाराला उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
या अनुषंगाने आज गायकवाड यांनी खडका येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराला बोलावून तीनशे रूपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या पथकाने त्यांना अटक करून जळगाव येथे नेल्याचे वृत्त होते. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सापळा व तपास अधिकारी श्री.शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव. PI.संजोग बच्छाव., PI.एन.एन.जाधव, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.कारवाई मदत पथक-
स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पोना.बाळू मराठे,पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंश.