अमळनेर मध्ये ईद-ए-मिलादुनबी मोठ्या उत्साहात साजरी.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : हजरत मोहम्मद पैगंबर साहिब यांची जयंती म्हणजेच ‘ईद-ए-मिलाद’ 16 सप्टेंबर रोजी होती, मात्र गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद एकत्र येत असल्याने पोलीस प्रशासनाने 16 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाची बैठक आयोजित केली होती. प्रशासनाच्या सूचनेनुसार अमळनेर नगरमध्ये गुरुवारी 19 रोजी पारंपारिक पद्धतीने ईद-ए-मिलादुल नबी साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यात कसाली मोहल्ला, शाह आलम नगर, जपान जीन, दर्गा अली मोहल्ला, आंदरपुरा, बहेरपुरा, इस्लामपुरा, उस्मानिया नगर येथून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. कसाली मोहल्ला येथील किल्ला चौकातून दुपारी २ वाजता निघालेली ही मिरवणूक वाडी चौक, सराफ बाजार, पंच कंदील चौक मार्गे जाऊन सायंकाळी ५ वाजता ईदगाह मैदानावर अस्र व मगरीबची नमाज अदा करण्यात आली. यावेळी सर्व परिसर व रस्ता रोषणाईने सजविण्यात आला होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सुनील नंदलवलकर, पीआय विकास देवरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.