मराठा समाजातर्फे २९ रोजी गुणवंतांचा सन्मान सोहळा.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे २९ रोजी कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात खासदार स्मिता वाघ यांचा नागरी सत्कार व गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील , असिस्टंट कमांडन्ट यशपाल पवार , निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील व डीवायएसपी वासुदेव देसले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.दहावी बारावी तसेच पदवी व पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ बी एस पाटील ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहणार आहेत.
सर्व मराठा समाज बांधवांनी या नागरी सत्कार सोहळ्यास व पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले आहे.