हाजीअली दर्गाला बॉम्बने उडवण्याची धमकी.

24 प्राईम न्यूज 27 Sep 2024.
मुंबई । हाजीअली दर्याला आलेल्या धमकीनंतर तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकीसह धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून ताडदेव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. कुर्ला परिसरात राहणारे तक्रारदार हाजीअली दर्गा येथे प्रशासकीय अधिकरी म्हणून कार्यरत आहेत. २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता त्यांना पवन नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने कॉल करून हाजीअली दर्गा खाली करा, नाहीतर तिथे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी दिली होती मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तेथे धाव घेतली आणि परिसर पिंजून काढला, मात्र तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.